Homeचंद्रपूरगोंडपिंपरीखरीप हंगाम पुर्व शेतकरी कार्यशाळा विठ्ठलवाडा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली...

खरीप हंगाम पुर्व शेतकरी कार्यशाळा विठ्ठलवाडा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

शरद कुकूडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

गोंडपिपरी :- दिनांक 26/5/2022 रोजी तालुका बीज गुणन केंद्र, विठ्ठलवाडा, तालुका गोंडपिपरी, जिल्हा चंद्रपूर येथे मा. आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली त्यांच्या पूर्वपरवानगी ने खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून मा. विभागीय कृषी सहसंचालक, नागपुर श्री भोसले सर, मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर श्री बऱ्हाटे सर, मा उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा तथा तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार, तालुका शेतकरी सल्लागार समिती चे अध्यक्ष श्री सांगडे सर उपस्थित होते, सदर कार्यशाळेला खरीप हंगाम विविध विस्तार तंत्रज्ञान अझोला वापर, युरिया ब्रिकेट वापर, हिरवळीचा खताचा वापर, ट्रायकोकार्ड बनविणे, निंबोळी अर्क बनविणे आणि त्याचा वापर, कापूस आणि धान पिक लागवडीतील विविध तंत्रज्ञान, रासायनिक कीटक नाशकचा कमी वापर करणे, बीज प्रक्रिया आणि बियाणे उगवण क्षमता , उकिरडा मुक्त गाव आणि खत युक्त शिवार, नाडेप बनविणे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कामगंध सापळे, बीज प्रक्रिया, मिनी राइस मिल, BBF लागवड तंत्रज्ञान, कापूस पिकात डवरणी सोबत खत देणे याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आलीत.
तालुक्यात होणाऱ्या भात शेतात मत्स्यपालन, शेततळे मधील मत्स्यपालन, रेशीम शेती, धान मधील पट्टा लागवड पद्धत बाबत प्रगतशिल शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यशाळेला तालुका कृषी अधिकारी गोंडपिपरी, मंडळ कृषी अधिकारी गोंडपिपरी व धाबा, सर्व कृषी पर्यवेक्षक, सर्व कृषी सहाय्यक, तालुका शेतकरी सल्लागार समिती चे सदस्य, प्रगतिशील शेतकरी, पुरस्कारप्राप्त शेतकरी, कृषी मित्र, कृषी केंद्र संचालक, औजारे विक्रेते आणि इतर सर्व सन्माननीय शेतकरी वर्ग व ईतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते….

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!