Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरी तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित...अध्यक्षपदी चंद्रजित गव्हारे तर सचिवपदी दिपक वांढरे...

गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित…अध्यक्षपदी चंद्रजित गव्हारे तर सचिवपदी दिपक वांढरे यांची निवड

गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुर्ण झाला.यामूळे आज (दि.२८) गोंडपिपरी शहरातील स्थानिक हॉटेल संदीप येथे गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी गठित करण्यात आली.यावेळी गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.लोकमतचे आक्सापूर बातमीदार चंद्रजीत गव्हारे यांची तर दै.महासागरचे तालुका बातमीदार दिपक वांढरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.उपाध्यक्षपदी दै.लोकमतचे बाबुराव बोंडे तर सहसचिवपदी नितीन पुद्दटवार यांची तर कोषाध्यक्षपदी दै.नवराष्ट्रचे प्रसेनजीत डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे.या कार्यकारणीत सल्लागार म्हणून अरुण वासलवार,अॕड.सचिन फुलझेले,बाळू निमगडे,संदीप रायपुरे यांचा समावेश आहे.तर सदस्य म्हणून समीर निमगडे,राजकपूर भडके,राजू झाडे,नितेश डोंगरे,सुरज माडूरवार,दिलीप बच्चूवार,राजेश माडूरवार,प्रशांत कोसनकर,रुपेश निमसरकार,प्रमोद दुर्गे आदींचा समावेश आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या नवनियुक्त कार्यकारिणीचा कार्यकाळ समोरिल एक वर्षासाठी असणार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!