Home Breaking News माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांच्याकडून अपघातग्रस्त युवकाच्या उपचाराकरिता आर्थिक मदत..

माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांच्याकडून अपघातग्रस्त युवकाच्या उपचाराकरिता आर्थिक मदत..

418

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील अपघातग्रस्त व्यक्तीला उपचाराकरिता आर्थिक मदत हवी असल्याची माहिती माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांना माहिती होताच अपघातग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदत केली. येथील महेश ‌बोडेवार हा युवक एक वाहन चालक आहे रोजंदारी ने खाजगी वाहन चालवून परिवाराचा पालन पोषण करत होता दिनांक २३-०४-२०२२ रोजी नागपूर येथे रोजीने गाडी घेऊन गेला असता नागपूर येथे त्याचा अपघात झाला तात्काळ त्या युवकाला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचाराकरिता पैशांची आवश्यकता होती. सदर बाब माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांना कळताच त्यांनी सामाजिक दायित्व निभावत अपघातग्रस्त युवकाच्या मित्रपरिवाराची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली..

राजे अंबरीशराव महाराज आत्राम पालकमंत्री असतांना व आता पद नसतांनाही नागरिकांच्या मदतीला धावून येत आहेत. तसेच कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केल्यास आवर्जुन उपस्थिती दर्शवित असतात. त्यांच्या या कार्याचे, मदतीचे जनतेमध्ये कुतूहल होत असून निरंतर असेच कार्य राजे अंबरीशराव महाराज यांच्या वतीने सुरू राहणार आहे. आज केलेलया मदतीने अपघातग्रस्त व्यक्तीचे कुटुंबाने राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांचे धन्यवाद मानले आहे..

Don`t copy text!