टायगर ग्रुपच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मिळाले जीवनदान…

607

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आल्लापल्ली: दिनांक १७/०४/२०२२ ला रोजी रविवारला रात्री दहा वाजता बाबुराव झोडे आरेंदा वरून काही कामानिमित्त आपल्या दुचाकी ने आलापल्लीला येत असताना आलापल्ली पासून 20 किलोमीटर अंतरावर भामरागड रोडवरील कासपल्ली येथे त्यांच्या गाडीचा तोल जाऊन एका झाडाला धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झाले व बेशुद्ध अवस्थेत पडून होते. त्यावेळी तिथून रोजंदारी कामाला जाणारे लोकं जमा झाले. त्यांनी प्रत्येक गाडीला थांबविन्याचा प्रयत्न करत होते पण कुणीही गाडी थांबवत नव्हते थांबलीच गाडी तर त्यांना विनंती करूनही कुणी त्यांना आलापल्ली हॉस्पिटलमध्ये सोडून द्यायला तयार होत नव्हते. सदर बाब टायगर ग्रुप च्या सदस्यांना कळताच टायगर ग्रुपचे सचिव आदर्शभाऊ केशनवार व कोषाध्यक्ष सागरभाऊ रामगोनवार आणि रक्त सेवक कुणाल वर्धलवार यांनी टायगर ग्रुपच्या रुग्णवाहिका ने जाऊन त्यांना शासकीय रुग्णालय अहेरी येथे भरती केले व तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना त्याच रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरीता शासकीय रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले..