HomeBreaking Newsजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टोलानांदगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा जलोष्यात संपन्न..

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टोलानांदगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा जलोष्यात संपन्न..

शरद कुकुडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी : पंचायत समिती गोंडपिपरी येत असलेल्या जि.प प्राथ.शाळा टोलानांदगाव येथे नुकतेच शाळा पूर्व तयारी मेळावा शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष भारत येलमुले यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी समाधान भासरकर व केंद्रप्रमुख सज्जन तेल्कापल्लीवार यांच्या प्रेरणेतून संपन्न झाला.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत चेक नांदगांवचे सदस्य सुधाकर झाडे , राकेश आत्राम,ऋषी कोरडे,प्रभाकर येलमुले,बाबुराव कोडापे,दिनकर झाडे,प्रकाश आत्राम,धनराज येलमुले, नीता धोडरे,अनिता येलमुले,कुसुम वाट,सुगंधा कन्नाके,सुंदरा झाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भिकारू कुळमेथे यांनी केले तर शाळापूर्व तयारीचे महत्व व त्याचे आयोजन नियोजन कसे करायचे, त्यात पालकांची व शिक्षकांची जबाबदारी काय असणार याविषयी सविस्तर माहिती शाळेचे सहाय्यक शिक्षक संतोष उईके यांनी सांगितली.त्यानंतर अध्यक्ष भारत येलमुले यांच्या हस्ते फीत कापून प्रत्यक्ष मेळाव्याला सुरुवात झाली.त्यात विद्यार्थी नोंदणी पासून ते गगन पूर्व तयारी पर्यंत एकूण सात स्टॉल लावण्यात आले होते.त्या प्रत्येक स्टॉलवर विविध साहित्याची सजावट करून पुढील सत्रात पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थांना त्या स्टॉलवर विविध कृती करवून त्यांच्या नोंदी ठेवल्या गेल्या.

स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आशिष कोरडे या विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व आभार संतोष उईके यांनी केले.
वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!