शाहीर शाम रोकडे यांच्या पोवाड्यातून उलगडले बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र…! श्री क्षेत्र वडज येथे बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी.

391

वडज : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ “वी जयंती श्री क्षेत्र वडज येथे मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. वडज गावच्या इतिहासात प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली,महापुरुषांच्या प्रतिमांच्या मिरवणुकी नंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करीत सामूहिक संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करून पोवाड्यांच्या कार्यक्रमास सुरुवात केली,यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्रातील नामवंत शाहीर शाम रोकडे यांचे शाहिरी पोवाडे सादरीकरण झाले,या कार्यक्रमाचे आयोजन नवजवान बौद्ध संघ वडज,वंचित बहुजन आघाडी,जुन्नर तालुका,ग्रामपंचायत वडज,विविध कार्यकारी सेवा सोसायटी,वडज समस्त ग्रामस्थ वडज यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलस्वामी को ऑप सोसायटीचे उपाध्यक्ष संतोषदादा चव्हाण,सुनीलदादा चव्हाण वडज गावचे विद्यमान सरपंच,वडजगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदाताईचव्हाण,कुलस्वामिनी ट्रस्टचे संचालक तुकाराम बबन चव्हाण,जेष्ठ नागरिक संघटना व ग्रामपंचायत कोरकमेटी अध्यक्ष,अमोल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य वडज,विविध कार्यकारी सोसायटी चे व्हाईस चेअरमन जितेंद्र साईनाथ चव्हाण कैलास किसन चव्हाण विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन राजेंद्र शंकर चव्हाण,विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक,वडज गावच्या पोलीस पाटील वंदनाताई शेळके,वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक प्रा. किशोरजी चौरे,वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सचिव गिरीराज वाव्हळ,वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सहसचिव गणेश जनार्दन वाव्हळ,वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष जुबेर शेख,वंचित बहुजन महिला आघाडी च्या जुन्नर तालुका अध्यक्षा निलमताई खरात,वंचित बहुजन महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पूजाताई जगताप,(वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका महासचिव,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य समाज समता संघ ) सागर जगताप,सहसचिव आरीफ पटेल, राविभाऊ भोजने,गणेश सोनवणे,विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सुरेश डोळस,धनंजय डोळस,सतीश ताजने साहेब,विकासभाऊ डोळस, समाज समता संघ जुन्नर तालुका अध्यक्ष किशोरजी कडलाक, भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा पालकमंत्री रवींद्र अभंग,भारतीय बौद्ध महासभेचे जुन्नर तालुका अध्यक्ष अतिष उघडे,भारतीय बौद्ध महासभेचे जुन्नर तालुका महासचिव अरविंद पंडित,शिवव्याख्याते स्वप्नवेध अनाथालयाचे सचिनभाऊ भोजने,सिध्दार्थ डोळस,निशान डोळस,आंनद डोळस,होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेशभाऊ चव्हाण यांनी केले,वडज गावच्या ग्रामस्थांनी महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्व समाजाला एक अमूल्य असा संदेश दिला गावातील सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांच्या एक विचाराने सर्व गावाने मिळून महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी केली.बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र सार्थ केला तो म्हणजे *शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा* सर्व ग्रामस्थ एकोप्याने उत्साहाने आणि जिव्हाळ्याने एकत्रित होऊन जयंतीमध्ये सहभागी होते.