प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)
आल्लापल्ली: हनुमान जन्मोत्सव निमित्त टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे टायगर ग्रुपच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या शिबिरात एकूण 62 रक्तदात्यांनी रक्तादान केले. टायगर ग्रुप चे सर्व सदस्य गण मिळुन खुप छान शिबीर आयोजित केले या शिबिरा मागे उद्देश असा होता की, लोकांना आपतकालीन काळात वेळेवर रक्त मिळावे. सोबतच लोकांना रक्ताचे महत्त्व काय असते हे समजून सांगण्यासाठी टायगर ग्रुप तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे खूप खूप धन्यवाद व अभिनंदन करण्यात आले. तसेच हनुमान जयंती निमित्याने आल्लापल्ली येते हनुमान जयंती साजरी करण्यात आली आणि खूप मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली आणि या रॅली मध्ये आल्लापल्ली येथील तसेच आल्लापल्ली ला लागून असलेले इतर गावातील लोकांचा सुध्दा खूप छान प्रतिसाद मिळाला.
रक्तदान शिबिरात छोटू सडमेक,धनराज रामटेके,राहुल मेश्राम, सुरज येरमाशेट्टी, सुरज दुर्गे,शैलेश आत्राम,अनंत दामाजी चुनारकर, प्रथमेश मददीवार,भुषन गंगावने,स्वप्निल दुर्गे,सेजल दामाजी डोंगरे,पुनम कुशवाह,नितिन नंदावार, विवेक मिरालवार, हनमंतू एम. कुळमेथे,राहूल यादावार, सजय कोटरंगे, अविनाश चंद्रगिरीवार,यशवंत मिलकंट मडावी,दिप कानाबार, व्यंकेटेश चौधरी,टक्कूभाऊ तोडसाम,शामकुमार कावरे,चेतन गदेवार, अक्षय मांडोरे,दिपक मुत्यालवार,विनोद भोयर,वैष्णवी गोटेपोडे, सचिन पि. रामगोनवार, लक्षमन येनगंदलवार, यामिनी ताई, पेवरथ मंडल,चंद्रकांत सडमेक,त्रिशुल डांगरे,अमोल शंकर समीलवार, सुकरंजन हलदार, रमेश मलय्या मद्देलावार,विलास रॉय,राहूल मांडोरे,प्रकाश लक्ष्मन शिंधनेर,सचिन वर्धलवार, सागर शंकर हुरकुंडे,नागराज गंजीवार,जितेंद्र औडपल्लीवार, स्वप्नील राजन्ना गंजीवार,शिवाजी रविंद्र विश्वास, अमोल शंकर नायनुवार,हेमंत श्रीकांत गायन,विजय आरेवार, मयुर सुधाकर नरडे,गजानन सडमेक, दिलीप उईके,विनय राठोड, रुनाल राजु झोरे,अक्षय संजय कुळमेथे, व्यंकटेश कप्पलवार, नितीन सिडाम, गुरुदेव दंडेकेवार, रुपेश मडावी,सोनाली कोवे,रोशन गोडसेलवार,गजानन लोनबोले, दिक्षांत मडावी, लोकेश डांडेकेवार यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरात टायगर ग्रुप चे अध्यक्ष दौलत भाऊ रामटेके , उपाध्यक्ष श्रीकांत जल्लेवार,सचिव आदर्शभाऊ केशनवार, कोषाध्यक्ष सागर रामगोणवार,रक्त सेवक कुणाल वर्धलवार, टायगर ग्रुप चींतलपेठ चे अध्यक्ष सुरज दुर्गे ,त्रिशूल डांगरे, वासू मुत्यालवार सर्व सदस्य उपस्थित होते






