नागपूर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नागपूर घोषित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ आंबेडकरांच्या 131व्या जयंती अनुषंगाने तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात घटनाकार डॉ आंबेडकरांची सामाजिक समता या विषयावर प्रसिद्ध तत्त्ववेत्ते डॉ कोमल ठाकरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या प्रसंगी ते म्हणाले, बाबासाहेबांनी सामाजिक समतेचे जे सूत्र सांगितले आहे त्यांचे काटेकोरपणे पालन उद्याचा भारत घडविणारया युवकांनी करणे हिचखरी क्ष्रेष्ठ भावना ठरेल असे प्रामाणिक मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या कार्यकर्तुत्वाचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले.
अध्यक्षिय भाषण करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ स्वाती धर्माधिकारी यांनी संविधानाचे मूल्य उलगडत महिलांच्या उत्थानात बाबासाहेब यांच्या सामाजिक जाणीवांना उद्ध्रूत केले. याच निमित्ताने एम.एस.डब्लू चा विद्यार्थी सूरज दहागावकर यांनी बाबासाहेबांना लिहिलेलं पत्र वाचून सर्वांना मंत्र मुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ हिरालाल मेश्राम यांनी तर आभार डॉ रोशन गजबे यांनी मानले.डा.आबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रा.वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्ष्री.रवि सोमकुवर, संदिप रहाटे, गजानन होले, विजय वरठी व हेमंत खेडीकर यांनी विशेष सहकार्य केले.






