टायगर युथ बहुउद्देशीय विकास स्वयंसेवी संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचे आल्लापल्ली येथे उदघाटन संपन्न…

266

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आल्लापल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त टायगर युथ बहुउद्देशीय विकास स्वयंसेवी संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आल्लापल्ली येथील क्रीडा संकुल ग्राउंड समोर श्रीराम चौक येथे करण्यात आले.

जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनाला
उदघाटक म्हणून मा.अंबरीशराव महाराज आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अवदेशराव बाबा आत्राम , प्रवीणराव आत्राम प्रमुख मार्गदर्शक विग्नेश भोयर आणि आलापल्ली ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर रामटेके उपस्थित होते.

सोबतच यावेळी टायगर्स स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष दौलत रामटेके, संचालक साई तुलसिगारी, उपाध्यक्ष श्रीकांत जल्लेवर, कोषाध्यक्ष सागर रमगोणवार, सचिव आदर्श केशनवार, सहसचिव कुणाल वर्धलवार, सदस्य सचिन रामगोनवार, मनोज धुर्वे, धनराज रामटेके, गणेश मोहूरले, संस्कार दहागावकर, प्रमोद येलमुले, गणेश येलमुले, जीवन मंत्रीवार, छोटू सडमेक, रूनाल झोरे, अमोल सामिलवार, कुणाल सल्लम, फ्रॅंकलिन सल्लम व समस्त टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते…