Homeनागपूरग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्रासाठी देण्यासाठी 1 एप्रिलपर्यंत...

ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्रासाठी देण्यासाठी 1 एप्रिलपर्यंत विशेष मोहीम कार्यक्रमाचे आयोजन

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर, दि.15: जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, आरोग्य, शिक्षण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष मोहीम जिल्ह्यात सर्वदूर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, समाज कल्याण सभापती नेमावली माटे, अर्थ व शिक्षण सभापती भारती पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे,कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यात स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व आणि वैश्विक ओळखपत्र( युडीआयडी कार्ड) देण्यासाठी तपासणी व निदान विशेष शिबीरांचे आयोजन डिसेंबर 2021 मध्ये नियोजनबध्द पध्दतीने नागपूर ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र-बेला, ग्रामीण रुग्णालय उमरेड, भिवापूर, कुही, नरखेड येथे करुन 5 हजार 8 दिव्यांग व्यक्तींची तपासणी व निदान करुन त्यापैकी 4 हजार दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच देण्यात आले आहेत.
जिल्ह्याच्या उर्वरित नऊ तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी लाभार्थ्यांची तपासणी व निदान करुन ऑनलाईन पध्दतीने दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तालुकानिहाय शिबीर 14 मार्च पासून सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या कालावधीत सुरु झाले आहेत. 1 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या विशेष मोहीमेत दिव्यांगत्व तपासणी व निदान शिबीराचे करण्यात येत आहे. नव्याने जिल्हृयाच्या ग्रामीण भागातील 5 हजार दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच देण्याचा मानस आहे.
ग्रामीण रुग्णालय निहाय शिबीराचे वेळापत्रक या प्रमाणे आहे. बुधवार 16 मार्च रोजी कामठी, शनिवार, 19 मार्च कळमेश्वर, सोमवार, 21 मार्च काटोल, बुधवार,23 मार्च सावनेर, गुरुवार, 24 मार्च रामटेक- कुटीर रुग्णालय व सोमवार, 28 मार्च ग्रामीण रुग्णालय रामटेक, बुधवार, 30 मार्च मौदा आणि शुक्रवार 1 एप्रिल पारशिवणी येथे होणार आहे.
यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिक, त्यांचे पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना तसचे दिव्यांग कल्याणार्थ कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांना आवाहन करण्यात येते की,ज्या दिव्यांग व्यक्तीकडे जूने दिव्यांग प्रमाणपत्र आहेत किंवा दिव्यांग प्रमाणपत्र नाहीत, त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरीता नजीकच्या नागरिक सुविधा केंद्रातील कॉमन सर्विस सेंअरमध्ये किंवा नजीकच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन स्वावलंबन या पोर्टलवर प्राथमिक नोंदणी करुन घ्यावी. या विषयी अधिक माहितीसाठी डी.डी.आर.सी मधील सल्ला व मार्गदर्शन कक्षातील प्रवर्ग निहाय दिलेल्या 7755923211,7387095077,7756855077 व 7385753211 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!