Homeनागपूरग्राहक राजा जागा हो’ या उक्तीनुसार ग्राहकाने जागरुक रहावे – आर. विमला

ग्राहक राजा जागा हो’ या उक्तीनुसार ग्राहकाने जागरुक रहावे – आर. विमला

नागपूर, दि.15: मार्केटमध्ये स्वस्त वस्तु घेण्याच्या नादात निकृष्ट वस्तु आपल्या हातात लागते. आपली फसवणूक झाली हे नंतर कळते. यासाठी ‘ग्राहक राजा जागा हो’ या उक्तीप्रमाणे नागरिकांनी जबाबदारीपूर्वक जागरुतेने दैनंदिन व्यवहार केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी येथे केले.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेच्या वतीने आज जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे करण्यात आले, यावेळी उदघाटनपर भाषणात त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, वैधमापनशास्त्र यंत्रणेचे सहनियंत्रक पांडुरंग बिरादर, अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य अविनाश प्रभूणे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, अन्नधान्य वितरण अधिकारी भास्कर तायडे यावेळी उपस्थित होते.
ग्राहकांनी वस्तु विकत घेतांना निट पाहिली पाहिजे. त्यावरील किंमत तपासून घ्यावी. खाद्यपदार्थावरील दिनांक व वजन निट तपासून घ्यावा. त्यामुळे फसवणूकीमुळे आपले संरक्षणच होणार आहे. पेट्रोल-डिझेल मध्ये ग्राहकांची नेहमी फसवणूक होते. त्यासाठी अत्यंत जागरुक राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गॅस वितरण कंपनीकडे शंभर किलोग्रॅमचे वजनयंत्र असले पाहिजे. या बारीक बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सादरीकरणाद्वारे कशा प्रकारे विक्री व खरेदी करावी त्याच बरोबर ग्राहक संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तक्रारकर्ता आर.के.पाटील यांचे मनोगत, देवेंद्र तिवारी, मोहम्मद शाहीद शरीफ यांनी इतर सदस्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
प्रारंभी बचत भवन परिसरात आयोजित वेगवेगळया विभागाच्या प्रदर्शनींना जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व जॉन एफ. केनेडी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!