Homeनागपूरऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात मराठीचा गजर.. _मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने काव्यवाचन व...

ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात मराठीचा गजर.. _मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने काव्यवाचन व गीत गायन स्पर्धा_

नागपूर -ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर येथे मराठी राजभाषा दिनानिमित्ताने दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी काव्यवाचन व गीत गायन स्पर्धा आयोजित करुन कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करीत मराठी भाषेचा गजर करण्यात आला.

महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक समिती व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक पातळीवरील मराठी काव्यवाचन व गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या २३ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले काव्यवाचन व गीत गायन सादर केले. स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉ. प्रशांत सूर्यवंशी, प्रा. सुधीर जिंदे व विनयकुमार सोलंकी लाभले होते. स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. जान्हवी शेंडे (तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर), द्वितीय पुरस्कार कु. चेतना पाटील (खापरखेडा महाविद्यालय), तृतीय पुरस्कार कु. भुमिका लोणारे (ज्ञानदीप कॉलेज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कळमेश्वर) यांना प्राप्त झाला. सर्व सहभागी स्पर्धकांना महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ. चंदनसिंह रोटेले, उपाध्यक्ष श्री. केदारसिंह रोटेले व संचालिका कु. काजोल रोटेले यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शालिनी तोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल कल्पना मुकुंदे यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. व्‍यंकटी नागरगोजे आणि सहसमन्वयक म्हणून कल्पना मुकुंदे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी, स्पर्धक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!