-रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त वतीने ऑनलाईन वेबीनारव्दारे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यामध्ये जागतिक सामाजिक न्याय दिवस या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. संजय शिंदे उपस्थित होते.
ॲड. जी.ए. लव्हाळे यांनी जगात शांतता नांदण्यासाठी न्यायाचे गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.टी. जुमडे यांनी केले. आभार जिल्हा विधीज्ञ संघाचे सहसचिव ॲड. व्हि.जे. सानप यांनी मानले.