Homeचंद्रपूररक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...बाळासाहेब ठाकरे जयंती, प्रजासत्ताकदिनानिमित्त शिवसेनेचे आयोजन

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…बाळासाहेब ठाकरे जयंती, प्रजासत्ताकदिनानिमित्त शिवसेनेचे आयोजन

चंद्रपूर: शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि प्रजासत्ताकदिनानिमित्त शिवसेनेच्या जटपुरागेट शाखेतर्फे रक्कदान शिबिर पार पडले. जटपुरागेटजवळील दवाबाजार चौकात पार पडलेल्या रक्तदान शिबिराला उक्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उदघाटन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख रमेश देशमुख यांनी केले. अध्यक्षस्थानी डॅा. आनंद बेंदले होते. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रशांत जाजू, समाजसेवक नंदू मोगरे, शिवसेनेच्या शिक्षकसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश नायाडू, कामगारसेनेचे जिल्हाप्रमुख जयदीप रोडे, माजी शहरप्रमुख मनोज पाल, माजी जिल्हाप्रमुख दीपक बेले, परियोग बिल्डर्सचे संचालक रितेश गंधारे यांची उपस्थिती होती. या शिबिरात शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवकांनी रक्तदान केले. कोविडच्या काळात रक्ताची आवश्यकता भासते. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनीही रक्कदान शिबिर घेण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले होते. त्याची दखल घेत शिबिर घेण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्ते प्रतिसाद मिळाला. माजी नगरसेवक आकाश साखरकर यांच्या नेतृत्वात हे शिबिर पार पडले. आयोजनाकरिता निखिल शेंडे, सुरेंद्र तेलमासरे, सोनू आगडे, गोलू तेलमासरे, आकाश चवरे, कुणाल हजारे, प्रवीण मारटकर, हर्षल शिंदे, गौरव तेलमारसे, संजय बेले यांच्यासह अन्य सदस्यांनी सहकार्य केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!