Home चंद्रपूर बल्लारपूर आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याची ऊर्जा सत्कारामुळे प्राप्त होते. - हरीश शर्मा...

आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याची ऊर्जा सत्कारामुळे प्राप्त होते. – हरीश शर्मा जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान…

नागेश इटेकर,सहसंपादक

प्रत्येक क्षेत्रात कार्यरत व्यक्तीला त्याच्या कार्यात सर्वोत्तम कार्य करण्याची जिद्द व चिकाटी असली पाहिजे. प्रामाणीकपणे कार्य करून आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणे व त्यांच्या कार्याचा गुणगौरव सत्कार स्वरूपात केल्याने त्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष, बल्लारपूर यांनी या प्रसंगी केले.
जेसीआय राजुरा रॉयल्स च्या वतीने बल्लारपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृह येथे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, जेसीआय चे उपक्षेत्रीय उपाध्यक्ष प्रतीक सारडा, जेसीआय राजुरा अध्यक्ष सुशीला पुरेड्डीवार, माजी अध्यक्ष सुषमा शुक्ला, जेसी स्मृती व्यवहारे उपस्थित होते.
या कार्यक्रमात तरुण भारत चे राजुरा तालुका वार्ताहर बादल बेले, पत्रकार संतोष कुंदोजवार, राममिलन सोनकर, सुरेश साळवे, श्रीकृष्ण गोरे, किरण घाटे या पत्रकाराचा मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसी मंजू गौतम यांनी केले. तर जेसी मधूस्मिता पाढि यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जेसी स्वरूपा झंवर, राधा विरमलवार, डॉ. मनीषा पाटणकर, रितू पांढारे, मनीषा पुन, प्रफ्फुला धोपटे, लक्ष्मी प्रसाद, शांता ठाकूर, नैना तान्द्रा, नितु खेडेकर, स्वतंत्रकुमार शुक्ला, प्रवीण खेडेकर, रामसुमेर निषाद, संमेया एलकापल्ली आदींनी सहकार्य केले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

प्रिया झांबरे यांची भ्रमणध्वनीवरून मुख्य सचिवांशी चर्चा… बल्हारपूर तलाठी रेकॉर्ड मधील सातबारा खोडतोड प्रकरण…

चंद्रपूर- जिल्ह्यात सध्या बल्हारपूर तलाठी दप्तर मधील आदिवासींना वाटपात मिळालेल्या शेतजमिन सातबारातील खोडतोड प्रकरण चांगलेच गाजत असुन या बाबतीत वरिष्ठांकडे एक दीड महिन्यांपूर्वीच तक्रारी...

महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या बीआयटीच्या दोन प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

चंद्रपूर - महिला शिक्षिकेचा विनयभंग करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्ह्यातील बल्लारपूर येथील 'बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या ('बीआयटी'च्या) २ प्राचार्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात...

धक्कादायक घटना: अन्न व पाण्यावाचून भूकबळीने माय-लेकीचा मृत्यू…बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील घटना…

बल्लारपूर :- मागील महिनाभरापासून अन्न व पाण्यावाचून मायलेकीचा राहत्या घरात तडफडून मृत्यू झाल्याची हृदयदायक तितकीच समाजमन व मानवी मनाला सुन्न करणारी घटना कोठारीत उजेडात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष..

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकराच्या हैदोसामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता...

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

Recent Comments

Don`t copy text!