HomeBreaking Newsस्व. श्री. नाशिकराव तिरपुडे जयंतीनिमित्य "90.8 एफ. एम. अपना नागपूर" कम्युनिटी रेडिओ...

स्व. श्री. नाशिकराव तिरपुडे जयंतीनिमित्य “90.8 एफ. एम. अपना नागपूर” कम्युनिटी रेडिओ चे लोकार्पण…

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे प्रथम उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे संस्थापक अध्यक्ष, व युगांतर शिक्षण संस्था नागपूर चे संस्थापक अध्यक्ष, स्व. श्री. नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या 102 व्या जयंतीदिनी दि. 16 जानेवारी रोजी युगांतर शिक्षण संस्थेद्वारा संचालित तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने 90.8 एफ. एम. अपना नागपूर या कम्युनिटी रेडिओ केन्द्राचे कार्यान्वयन व प्रसारण सुरु करण्यात आले.

इन्फॉरमेशन अॅड ब्रॉडकास्टींग मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली व युगांतर शिक्षण संस्थेद्वारा संचालित तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय यांच्यात झालेल्या करारानुसार या रेडिओ केंन्द्रास मंजुरी मिळाली आहे. स्थानिक रेडिओ श्रोत्यांना याद्वारे विविध माहितीपुर्ण तसेच करमणुकी चे कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये मराठी, हिन्दी, इंग्रजी तसेच इतरही भाषांत प्रसारण होणार आहे. युगांतर शिक्षण संस्थेच्या सिव्हिल लाईन्स स्थित परिसरात निर्माण केलेल्या स्टुडिओ व तांत्रिक व्यवस्था उभारली गेली आहे.

स्व. श्री. बाळासाहेब तिरपूडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून राष्ट्रगीता नंतर सकाळी सहा वाजेपासुन रेडिओ केंन्द्राच्या प्रसारणाचे उद्घाटन युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राजकूमार तिरपुडे यांच्या हस्ते झाले. विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोकप्रिय नृत्य ‘जेरुसलेमा‘ चे प्रस्तुतीकरण देखील या वेळी केले गेले व सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

या प्रसंगी युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राजकुमार तिरपुडे, कार्यकारी अध्यक्षा श्री. वनिता तिरपुडे, कार्यकारणी सदस्या घना तिरपुडे, श्री. कलश तिरपुडे, सरचिटणीस श्री. गणेश गौरखेडे, सचिव श्री. जयंत (बाबा) कोंबाडे तसेच तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या डॉ. स्वाति धर्माधिकारी, तिरपुडे इंस्टीटयुट ऑफ मॅनेजमेन्ट एज्युकेशन चे प्राचार्य डॉ. ललित खुल्लर, नाशिकराव तिरपुडे शारीरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक अवसरे, बालासाहेब तिरपुडे हॉटेल मॅनेजमेन्ट महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अक्षय दंडाळे प्रामुख्याने उपस्थीत होते.
अपना नागपूर च्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती.ऋचा मांजरखेडे , रेडिओ जॉकी अंकिता पोहरकर व अभिषेख बेल्लरवार यांच्या द्वारे प्रसारणाचे संचालन केले गेले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!