कास्ट्राईब तर्फे नामांतर लढ्यातील शहीदांना अभिवादन

245

नागपूर जिल्हा प्रतिनिधी 
आंबेडकरी ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेल आंंदोलन म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन. सामान्य कार्यकर्त्याच्या रक्तातून लिहलेल आंबेडकरी चळवळीच सोनेरी पान म्हणजे नांमातर लढा . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराडवाडा विद्यापीठा नांमातर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना कास्ट्राईब महासंघातर्फे नांमातर शहीद स्मारक नागपूर येथे कास्ट्राईब महासंघातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगीअध्यक्ष मा.अरुण गाडे ,जेष्ट कामगार नेते मा.शामराव हाडके, कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाअध्यक्ष सिध्दार्थ ऊके, प्रसिध्द गझलकार ह्रुदय चक्रधर,प्रसिध्द आंबेडकरी कवी भीमराव गाणार ऊपस्थित होते.