कमलापूर येथील हत्ती गुजरातमध्ये नेण्याचा प्लान रद्द होईल : ना. विजय वडेट्टीवार.

0
115

अहेरी तालुक्यातील #कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.


परंतु, आता तिथेच भव्य एलिफंट पार्क तयार करण्याचे मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचे काँग्रेसचे नेते व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यात हलविले जाऊ नये, यासाठी जनभावना लक्षात घेता शासनस्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
स्थानिक जनतेच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून पर्यटकांना आपलेसे करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आधी सात हत्ती होते. आता नव्याने एका हत्तीच्या बाळाचा समावेश झाल्याने एकूण आठ हत्ती झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here