वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी…

0
69

राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे राजमाता मॉ जिजाऊ साहेब यांच्या फोटोला विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ४२३ वी जयंती साजरी केली. तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाविषयी समीक्षा मोडक व समीक्षा जीवतोडे, श्रुती बोरकर,गोजिरी मोंढे, स्नेहा वांढरे,अनुष्का मोंढे,आकांक्षा भोंगळे आरोही या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयातील विद्यार्थीनीने एक-एक थोर महापुरुषांच्या पुस्तकाचे वाचन करणार असा सर्वांनी संकल्प केला.

स्वामी विवेकानंद म्हणतात की उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबू नका.थोर महापुरुषांचा विद्यार्थ्यांमध्ये विसर न व्हावा याकरिता वरूर रोड येथील वाचनालयात युवा सामाजिक कार्यकर्ता विशाल शेंडे, मेघा करमनकर यांच्या पुढाकारातून जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती बोरकर हिने केले तर आभार कल्याणी भोंगळे या विद्यार्थीनीने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here