गोंडपिपरी तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर;पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल

0
170

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी:राज्यात अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे मागील आठवड्यात हवामान खात्याने १० ते १३ तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला होता.हवामान खात्याचा अंदाज खरे ठरताना दिसत आहे. दि.१० सोमवार पासून गोंडपीपरी तालुक्यात पावसाने कहर सुरू केला.खरीप हंगामात कापूस,धानासह अतिवृष्टीमुळे सर्व पिकांना फटका बसला.खरिपात झालेली नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशी आशा असताना तालुक्यात दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे.शेतातील तुर काढणीला आली असून काही शेतकऱ्यांची तुर पाण्यात भिजत आहे.अवकाळी पावसाचा प्रत्येक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहनी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागनी शेतकरी करीत आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताला लागलेल्या पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आता दिसत आहे. महाराष्ट्र भर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलं आहे.शेतीचे बरेच नुकसान झाल्यामुळे समस्त शेतकऱ्यांचे सरकारी मदतीकडे डोळे लागले आहेत.तालुक्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडालीय.अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तूर,कापूस,धान या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला.अवकाळी पाऊस असाच सुरू राहिल्यास रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची भीती बळीराजाला सतावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here