खुशाली पत्रेची आकाशवाणीवर मुलाखत…

0
114

– गौरव लुटे (आरमोरी तालुका प्रतिनिधी)

कोंढाळा : मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद असले तरी शिक्षण सुरू आहे. राज्य सरकार जिल्हा शिक्षण विभाग व डायट संस्थेकडून विविध कार्यक्रम व उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. यातीलच ‘शाळा बाहेरची शाळा ‘ या उपक्रमांतर्गत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कोढाळा. येथील सहाविची विद्यार्थिनी खुशाली हरीभाऊ पत्रे यांची नागपूर आकाशवाणीवर मुलाखती साठी निवड झाली . मुलाखतीत तीने सर्व प्रश्नांची समर्पक उत्तर देऊन सर्वांची मने जिंकल्याने तिचा सरकारमान्य सरस्वती वाचनालय कोंढाला व मातोश्री ग्रुप कोंढाळा यांच्या हस्ते सत्कार कारण्यात आला. कोरोना संकटामुळे मुलांना शिक्षणात खंड पडू नये म्हणून व मुलांना कसल्याही प्रकारचे वाईट व्यसण लागू नये म्हणून यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर , प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा आलेले आहे. त्यातील ‘ शाळा बाहेरची शाळा ‘ इयत्ता ६वी ची विद्यार्थिनी खुशाली हरीभाऊ पत्रे.नागपूर आकाशवाणीवर निवड करून ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. यावेळी खुशालीने माझा अभ्यास व माझे शिक्षण , शाळा बंद असूनही घेत असलेले शिक्षण नाविन्यपूर्ण विविध उपक्रमात सहभाग घेतल्याने प्राप्त झालेले ज्ञान व शाळेमधून तसेच आईवडिलांकडून व वाचनालयातून मिळालेले मार्गदर्शन या बाबतीची सविस्तर पणे माहिती दिली. तसेच आकाशवाणीवरून समालोचक , शिक्षण तज्ज्ञांकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.कोंढाळा गावातील खुशाली व तीचे जील्हा परीशद शाळेतील मित्र परीवार हे गावात विविध माध्यमातून जनाजागृती करत असतातच.पथनाट्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव,पक्षी संवर्धन, कोरोना काळात स्वच्छतेचे संदेश देणे, नदी स्वच्छता करणे. प्रत्येक स्पर्धेमधे व उपक्रमात भाग घेत एक वेगळी ओळख खुशाली व तिच्या शाळेतील ह्या छोट्या छोट्या विद्यार्थांनी समजात निर्माण केली आहे….सरस्वती वाचनालयातील पदाधिकारी गिरीश भजनकार,सुरज चौधरी, राज्यस्तरीय उत्कृष्ट वकृत्व स्पर्धा पुरस्कार विजेती प्रियंका ठाकरे आणि निखिल बोरुले , आकाश राऊत या विद्यार्थ्यांनी खुशालीला प्रोत्साहित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here