जोगी साखरा येथे शिक्षिका दिन उत्साहात साजरा..

0
201

 

– गौरव लुटे आरमोरी तालुका प्रतिनिधी

जोगीसाखरा -सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून जोगी साखरा येथे शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. स्त्री शक्तिचा जागर व्हावा , आजच्या काळात स्त्री सक्षमीकरण का बरं महत्त्वाचे आहे या विषयांवर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वक्त्यांनी प्रकाशझोत टाकण्यात आली. सकाळी गावामधून फेरी काढण्यात आली. यात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांची लहान मुलांनी वेशभूषा साकारली. महात्मा ज्योतिबा फुले समाज सुधारक मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्या सौ वृंदाताई गजभिये गावातील प्रथम नागरिक संदीप भाऊ ठाकूर, जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. खरकाटे सर , जिल्हा परिषद उ.प्रा.शाळेचे मुख्यध्यापक सोरते सर, व ग्रा.पंचायत मधील सदस्या करिश्मा मानकर, ज्योतीताई मोहूर्ले, ज्योतीताई घुटके, स्वप्निल गरफडे, देवदास ठाकरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि शाळकरी मुले बहुसंख्येने उपस्थित उपस्थित होते. आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. आजची स्त्री अबला नसून ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. सावित्रीच्या लेकी यांनी आजच्या आधुनिक युगात उंच भरारी घेतली आहे.

असे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वक्तांनी आपल्या अनमोल वाणीतून प्रकट केले‌. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालनाट्य, नृत्य, संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले‌ होते. लहान मुलांच्या कलागुणांचा वाव मिळावा त्यांच्यातील कला लोकांसमोर येवून त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी अश्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. उद्घाटनाप्रसंगी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन सुनिल कुमरे व आभार प्रदर्शन खेमेश्वर मोहूर्ले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here