मोची, मादगी, मादरू,मादिगा महासंघ महाराष्ट्र च्या गोंडपिपरी तालुका अध्यक्ष पदी नागेश इटेकर स्थानिक समाज बांधवांनी केला जलोष्यात स्वागत आणि सत्कार

0
155

शरद कुकुडकर, प्रतिनिधी

गोंडपिपरी: दिनांक २ जानेवारी रोज रविवार ला शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे मोची, मादगी, मादरू,मादिगा महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित समाज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर तथा समाज मेळावा संपन्न झाला.कार्यक्रमात जिल्हा तसेच तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या,त्यात गोंडपिपरी तालुका अध्यक्ष पदाची धुरा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणारे ,पत्रकार क्षेत्रात अल्पा वधितच आपल्या नावाचा तुरा रोवनारे बहु आयामी व्यक्तिमत्त्व असे नागेश इटेकर यांचेवर सोपवण्यात आली.नागेश इटेकरांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली हे समजताच तालुक्यातील व स्थानिक समस्त मादगी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. काल ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधत नवनियुक्त तालुका अध्यक्ष नागेश इटेकर यांचा स्थानिक पंचशील वार्डात फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले आणि शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी समाजाचे जेष्ठ नेते तथा मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here