Home Breaking News भंगाराम तळोधी येथे जापनीज इंसेफेलाईटिस लसीकरणाचे शूभारंभ…

भंगाराम तळोधी येथे जापनीज इंसेफेलाईटिस लसीकरणाचे शूभारंभ…

360

नागेश इटेकर, प्रतिनिधी

गोंडपिपरी : प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत भंगाराम तळोधी आरोग्य उपकेंद्र येथे दिनांक ३ जानेवारी रोजी राजे धर्मराव शाळेतील विद्यार्थ्यांचे जापनीज इंसेफेलाईटिस(JE) लसीकरण करण्यात आले. त्याच बरोबर लसिकरणा विषयी
उपस्थिथांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.याच दिनाचे औचित्य साधत राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरा करण्यात आली. विद्यार्थी आपल्या गीत गायन आणि भाषणातून सावित्रीमाई फुले यांच्या जीवन पटावर माहिती सादर केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.वैष्णवी अमर बोडलावार जि.प.सदस्या चंद्रपूर, अमर बोडलावार माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अमर सौ. सूनिता भाणेश येग्गेवार पंचायत समिती सदस्य गोंडपिपरी,सौ.शशीकला माडूरवार,सौ.भोयर सरपंच चेकपिपरी,सौ.भस्की उपसरपंच सूपगाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तर प्राचार्य उराडे सर,सर्व शिक्षक,शिक्षिका,धर्मराव शाळेतील शिक्षक वृंद, तसेच आरोग्य सेविका,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Don`t copy text!