गोंडपिपरी येथील चिंतामणी कॉलेज तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला अध्ययन सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
186

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: येथे श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महिला अध्ययन व सेवा केंद्र यांच्या संयुक्त विध्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनांक 3 जानेवारी 2022 ला साजरी करण्यात आली.या दिवसाला बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून म्हटले जाते. या पित्यर्थ कॉलेज मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर मुलीनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच नेहरू युवा केंद्र याच्या सहकार्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग (rain water harvesting) या विषयावर रसायनशास्त्र विभागाने निबंध स्पर्धा आणि सुष्मजिवशास्त्र या विभागाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय कुमार यांनी बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन यावर आपले विचार प्रकट केले.कार्यक्रमाचे आयोजन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार आणि प्रा. अविनाश वि. चकिनारपूवार व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश वरघणे, प्रा. पूनम चंदेल मॅडम आणि ग्रंथपाल जोशी मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अविनाश चकिनापुवार यांनी केले.या कार्यक्रमाला महाविलायचे प्रा. डॉ.आशिष चव्हाण, डॉ. जगदीश गभने, डॉ. प्रतीक बेझलवार व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here