भंगाराम तळोधी शाळेत रांगोळी स्पर्धा घेऊन बालिका दिन साजरा…सुधाकर बावणे यांच्या मार्गदर्शनात व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न…

0
96

-सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: मुलींसाठी शाळेचा श्रीगणेशा करणाऱ्या फुले दाम्पत्य म्हणजे त्यात मोलाचे योगदान असणाऱ्या सावित्रीमाई फुले यांची जयंती “बालिका दिन” म्हणून मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.बालिका दिनाचे औचित्य साधून मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण बाबीची माहिती देण्यासाठी गोंडपीपरी मधील अष्टपैलू कलावंत व्यक्तिमत्व मा.सुधाकर बावणे यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत बालिका दिन साजरा करण्यात आला.
सावित्रीमाई स्वतः त्या काळात सनातनी लोकांकडून शेण,माती,दगड,धोंडे खात व इतर त्रास,अन्याय,अत्याचार सहन करून मुलींसाठी शिक्षणाचा द्वार खुले केले त्यांची जयंती मोठ्या थाटामाटात व रांगोळी स्पर्धा घेऊन पार पाडण्यात आली. याचसोबत सवित्रीमाईच्या कार्याचा जीवनपट उलघडण्यासाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.शाळेतील तब्बल २७ विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत सहभागी झाले होते.
सदर स्पर्धा व बालिका दिनाचा कार्यक्रम शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ.रेखा कारेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.त्यात विशेष अतिथी म्हणून मा.सुधाकर बावणे यांनी सवित्रीमाईची महती व व्यक्तिमत्व विकास बाबत विद्यार्थ्यांशी मनमुक्त संवाद साधला.शाळेतील चिमुकल्या सावित्रीच्या वेष परिधान करून “मी सावित्री बोलतेय ” या भूमिकेतून मुक्त संवाद साधत होत्या.याच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.प्रणिता उईके मॅडम यांनी केले व सौ.मालन धाबर्डे यांनी सवित्रीमाईच्या जीवन कार्याचा उलघडा करण्यासाठी सुंदर गीतगायन केले तसेच विचारपीठावर सौ.मडपूरवार मॅडम सौ.विशाखा मेश्राम,सौ.सरिता पेरकावार,कु.अर्चना थोरात उपस्थित होते.मॅजिक बस फौंडेशनच्या कु.रिनाली डोंगरे व प्रियंका चंदनखेडे या वेळोवेळी शाळेला व शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात त्या देखील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होत्या.
बालिका दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या भाषेत स्पर्धेत एकूण शाळेतील २७ विद्यार्थी सहभागी झाले असून त्या सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सरिता चौधरी या विध्यर्थिनीने केले तर आभार प्रदर्शन कु.श्रेया सहारे हिने केले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर मडावी,श्रावण गुंडेट्टीवार,सुधीर सहारे,दुशांत निमकर,अनिल चोखारे,विकास झाडे,राजेश्वर अम्मावार,आनंदराव मेश्राम,आकाश झाडे,अरुण झगडकर,तानाजी अल्लीवार यांनी सहकार्य केले तसेच शाळेचे मंत्रिमंडळ यांनी आयोजन,नियोजनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here