मा.छायाताई सावरकर- सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानीत

0
32

नागपूर जिल्हा प्रतिनिधी :
सी.मो. झाडे फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा 2021 चा मिराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार यंदा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्य महिला शाखा संघटिका
मा. छायाताई सावरकर यांना देण्यात आला आनंदवन वरोरा येथील जेष्ठ समाजसेवक आणि कृष्ठरोगी यांची अविरत सेवा करणारे डॉ. विकास साधनाबाबा आमटे यांच्या हस्ते हा पुरस्कार छायाताईंना देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाजसेवक आणि संजीवनी वृद्धाश्रमाचे संचालक डॉ संजय उगेमुगे तर प्रमुख अतिथी म्हणून मा.यदु जोशी( वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमत मुंबई) , आणि जेष्ठ सर्वोदयी विचारवंत आदरणीय मा. म.गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते, हा कार्यक्रम दाभा नागपूर येथील सत्यनारायण नुवाल व्यसनमुक्ती केंद्राच्या सभागृहात घेण्यात आला
यावेळी प्रामुख्याने अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेशजी झुरमुरे, राष्ट्रीय महासचिव हरिषजी देशमुख, महाराष्ट्र राज्य सचिव प्रशांतजी सपाटे, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुनीलजी वंजारी, युवा शाखेचे नागपूर जिल्हा संघटक आणि उत्तर पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख श्रावण खुदरे, नागपूर जिल्हा महिला संघटिका वंदना ठाकरे, मनोज ठाकरे ,राजेश वानखेडे आणि सामाजिक, सांस्कृतिक,पत्रकारिता, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here