सांघिक भावनेतून खेळाचे प्रदर्शन करावे–महेंद्र ब्राम्हणवाडे.. कळमगाव येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन..

0
50

चामोर्शी: कबड्डी हा आपल्या मातीशी जुळलेला खेळ असून संघ भावनेतून खेळाळूंनी कबड्डी हा खेळ खेळावा, या माध्यमातून येणाऱ्या काळात देशाला उत्तम दर्जाचे खेळाडू मिळतील असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.

चामोर्शी तालुक्यातील कळमगाव येथील भव्य डे नाईट खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून सरपंच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा काँग्रेस नेते प्रमोद भगत मुख्य अतिथी म्हणून ग्रा.प.सदस्य महादेवजी थोरेवार, संजय खेडकर, भरत तुंबडे, माजी सरपंच देवानंद तुंबडे, रवी धोटे, डॉ.गाटपल्लीवार, ग्रा.स. करिष्मा कीनेकर, ग्रामसेवक शशिकांत तुंबडे, माजी प.स.सदस्य सातपुते , गायकवाड शिक्षक, अशोक तुंबडे,उष्ठू भोयर,काँग्रेस नेते जितेंद्र मूनघाटे, कुणाल ताजने सह स्पर्धेत सहभागी संघाचे खेळाडू , गावातील नागरिक व मोठ्या संख्येने कबड्डी प्रेमी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले कबड्डी हा पारंपरिक खेळ असला तरी सद्यस्थितीत कबड्डी खेळाला जागतिक पातळीवर दर्जा मिळाला आहे त्यामुळे गाव खेड्यातील युवकांनी या खेळाकडे मनोरंजन किंवा वेळकाढू पण म्हणून न पाहता करीअर ची संधी म्हणून पाहावे.

स्पर्धेचे आयोजन महाराणा प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष होमदेव तुंबडे, उपाध्यक्ष प्रवीण तुंबडे, सचिव मिथून मेश्राम, सहसचिव पंकज लाड, कोषाध्यक्ष गजानन देशमुख, व्यवस्थापक विकास मडावी, क्रीडाप्रमुख नितीश थोरेवार, कर्णधार क्रांती तुंबडे आणि संपूर्ण चमूने मिळून केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here