मन्नेवार टायगर्स तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामना सम्पन्न व सामन्याचे बक्षिस वितरण….

0
205

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आल्लापल्ली: मनेवार टायगर यांच्या वतीने आल्लापल्ली येथे भव्य टेनिस बॉल (सर्कल) क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. मुलांचा मनात क्रिकेट बद्दल आवड निर्माण झाली पाहिजे, मूल जागरूक झाले पाहिजे यासाठी मनेवार टायगर तर्फे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रिकेट सामन्यांचे पहिले बक्षीस मा.ना. श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या तर्फे तर दुसरे बक्षीस मन्नेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने आणि तिसरे बक्षीस मा.विनोदभाऊ अकनपलीवर यांचा तर्फे देण्यात आले.

या क्रिकेट सामन्यांचे आयोजक समिती मध्ये राकेश गडमवार (अध्यक्ष), कृणाल सल्लम (उपाध्यक्ष), सुरज सल्लम, कृणाल रेड्डी (आयोजक),स्वप्निल गडमवर(कोषाध्यक्ष),शुभम सल्लम,महेश नैनवार(क्रीडा मंत्री) व तसेच निरज गंजीवार, रोहित गडमवार, स्वप्निल सारकेवर, वेंकटेश गडमवार, गौरव इर्किवार, रोशन गडमवार, विनीत आलम, क्रिश सारकेवर, गोलू गजलवार, वीरू तोर्रेम, बंटी सिडाम, सोनू सिडाम, वंश, पियूष, तुषार मट्टामी, आनंद कळबंडी , रोहित, कुणाल वर्धलवार, आणि सर्व मंडळातील सदस्यांनी खूप परिश्रम घेतले.

या क्रिकेट सामन्यांमध्ये पाहिले बक्षीस पटकविणारी टीम मनेवार टायगर सी सी अल्लापल्ली आहे तर दुसरे बक्षीस पटकविणारी टीम ही विजेता सी सी वडसा आहे आणि तिसरे बक्षीस पटकविणारी टीम ही विणर सी सी आल्लापल्ली आहे या सर्व टीमने खूप परिश्रम घेऊन बक्षीस पटकाविले.

आणि आजच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्मराव हायस्कुल आल्लापल्लीचे प्राचार्य संजय कोडेलवार सर होते आणि प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत आल्लापल्ली चे उपसरपंच विनोदभाऊ अकनपलीवर होते आणि आल्लापल्ली चे तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गडमवार आणि धर्मराव हायस्कुल चे पर्यवेक्षक शिदूरकर सर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here