HomeBreaking Newsमहाराष्ट्र शासनाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण (दलितमित्र) पुरस्काराने महानिर्मितीचे इंजी.श्री.सुभाष तेटवार सन्मानित

महाराष्ट्र शासनाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण (दलितमित्र) पुरस्काराने महानिर्मितीचे इंजी.श्री.सुभाष तेटवार सन्मानित

महानिर्मितीचे श्री.सुभाष किसनराव तेटवार यांना सन २०२१-२२ यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (दलितमित्र) नुकताच मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री आणि मा.समाजकल्याण मंत्री यांचे शुभ हस्ते प्रदान झाला असुन आजवर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा हा ख-या अर्थाने गौरव आहे.

श्री. तेटवार हे मागील ३० वर्षांपासून कामगार नेते, वृक्षमित्र, रक्तदान चळवळ, अपंग व निराधारांना मदत तसेच कुंभार समाजाच्या संघटनात्मक आणि रचनात्मक कार्यात महत्वपूर्ण सहभाग आदिं क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले आणि आजही करतात.

विशेषतः आजवर त्यांनी ७० वेळा रक्तदान केले. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात एक सामान्य कामगार ते उपकार्यकारी अभियंता हा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी असा आहे. विकलांग सेवा संस्थेचे (चंद्रपुर) अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली विकलांग लोकांची सेवा अधोरेखित करण्यासारखी आहे. महानिर्मितीत त्यांनी निष्ठेने प्रदीर्घ सेवा बजावली आहे. त्यांच्या या सेवाकार्याचा गौरव म्हणून “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारही” प्रदान करण्यात आला आहे.

सेवानिवृत्तनतंरही त्यांच्या निष्ठापूर्वक कार्याचा आणि अनुभवाचा फायदा महानिर्मितीला व्हावा म्हणून महानिर्मिती कंपनीत सहाय्यक अधिकारी, सौर ऊर्जा(उभारणी व देखभाल) या पदावर ते प्रादेशिक मुख्य अभियंता (नवीकरणीय ऊर्जा) नागपूर येथे कार्यरत आहे. त्यांच्या या सामाजिक सेवेचा महानिर्मिती परिवाराला सार्थ अभिमान आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!