वनिताताई तिरपुडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.. ९३ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

0
101

नागपुर: नाशिकराव तिरपुडे ब्लड सेंटर, नागपूर यांच्या तर्फे युगांतर शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष सौ. वनिताताई तिरपुडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, सिव्हिल लाईन, सदर येथे करण्यात आले.

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या एकूण ९३ रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी केले. या शिबिराच्या कार्यक्रमात युगांतर शिक्षण संस्था संचालित विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणी स्वतःच्या भावाला आणले, कुणी बहिणीला, कुणी नातेवाईकांना, तर कुणी आपल्या मित्र-मैत्रिणींना आणले. सोबतच प्रत्येकांनी विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ९३ रक्तदाते पुढे येऊन रक्तदान करून आदर्श निर्माण केला. त्यामुळे रक्तदान शिबिर यशस्वी झाले.

वाढदिवस म्हटला की, पार्टी डोळ्यांसमोर दिसते परंतु एका आगळ्यावेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करण्याचे युगांतर शिक्षण संस्थेच्या तिरपुडे ब्लड बँकने ठरविले यातूनच या सुंदर कार्यक्रम घडून आला…

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिकराव तिरपुडे ब्लड सेंटरचे अधिकारी, परिचारिका, कर्मचारी तसेच तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एस.डब्लू अंतिम वर्षाच्या वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्याचे शिक्षण घेत असलेले प्रितम गग्गुरी, तेजल वंजारी, श्रुतिका अंजनकर, वृषाली केकरे, अश्विनी डोये, कल्याणी खंडाळे, प्रतिक्षा निंबाळकर, दिपाली निकुरे, अश्विनी देवतळे, शुभांगी केकतपुरे, दिप्ती मोहोड, मनोहर हाडस, तुषार हुकरे, अनिकेत भिवगडे, उज्वला भंडारे, स्वर्णिमा लोखंडे, प्रिया वानखेडे आणि सूरज दहागावकर तसेच शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक आणि विशेष परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी केला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here