नागेश इटेकर,प्रतिनिधी
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील उज्वला गॅस योजना अंतर्गत भंगाराम तळोधी येथे गॅस सिलेंडर चे वितरण, प्राची गॅस एजन्सी गोंडपिपरी मार्फत करण्यात आले.या योजनेअंतर्गत,गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देण्याची सुविधा केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2020 रोजी अमलात आणली.उज्वला गॅस योजने अंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) महिलांना देण्यात येते.यात ४० गरजू लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर चा लाभ देण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.वैष्णवी अमर बोडलावार जि.प.सदस्या चंद्रपूर,सौ. सूनिताताई येग्गेवार पं. स.सभापती गोंडपिपरी,सौ. लक्ष्मीताई बालूगवार सरपंच भंगाराम तळोधी, विलासराव माडुरवार प्रतिष्ठित नागरिक भं तळोधी,दिपक सातपूते पंचायत समिती सदस्य गोंडपिपरी, सूरेंद्रजी घाबर्डे उपसरपंच भंगाराम तळोधी, जयेश कारपेनवार ग्राम पंचायत सदस्य,अमर बोडलावार माजी जि.प.सदस्य,प्राची गॅस एजन्सी चे संचालक महेंद्र सिंह चंदेल उपस्थित होते. या योजनेअंतर्गत, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देण्याची सुविधा केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2020 रोजी केली. या योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) महिलांना देण्यात येते.