तोहोगाव येथील माता मंदिर ते हनूमान मंदिर पर्यंत च्या सिमेंट कांक्रिट रस्त्याचे सौ.वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते भूमिपूजन…

0
109

गोंडपिपरी:जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हा निधी २०२१-२२ बांधकाम उप विभाग पोंभुर्णा अंतर्गत ग्राम पंचायत तोहगाव येथे माता मंदिर ते हनूमान मंदिर पर्यंत ५०००००/लक्ष रुपयाचे सिमेंट कांक्रिट रस्त्याचे भूमिपूजन सौ. वैष्णवी अमर बोडलावार जि.प. सदस्या चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले.भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतांना धाबा- तोहगाव जिल्हा परिषद क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचा वचन येथील जनतेला दिला होता. त्याच वचनाची पूर्तता करत,यासह गावात सौंदर्यीकरण,महापुरुषांचे पुतळे,खुल्या जागेत जिम ची सुविधा इत्यादी मूलभूत सुविधांचा समावेश असून लवकरच धाबा तोहगाव क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे सौ. अमावस्या ताडे सरपंच तोहगाव,सौ. शुभांगी मोरे उपसरपंच तोहगाव,ग्राम पंचायत सदस्य सौ.नागरकर, खामनकरजी,रामटेकेजी,तसेच प्रकाश उत्तरवार प्रतिष्ठित नागरिक तोहगाव,धोटेजी,अमर बोडलावार माजी जि.प.सदस्य चंद्रपूर, ग्राम सेवक जाधव,ग्राम पंचायत सदस्य तसेच असंख्य गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here