मुलच्या कलावंतानी साकारला लघु चित्रपट ”रंगोटी ”

0
341

चंद्रपुर: घरातला करता पुरुष पोटाची खळगी भरण्यासाठी कशा पद्धतीने जीवाचं रान करतो आणि दिवसभर राब राब राबून सुद्धा तो जेव्हा परिवाराला एका वेळेचे जेवण उपलब्ध करू शकत नाही. अशा वेळी नियती पुढे नतमस्तक होऊन किन्नर चे रुप धारण करतो.
याचे ज्वलंत उदाहरण या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक *श्री कृपाल महादेव लांजे असून लेखक श्री निलेश तानेश्वर जंपलवार* यांनी लिहिलेला आहे.
या अगोदर यांनी *घरटं, बाप, अनाथ, शाहिद की आत्मा* या सारखे अनेक चित्रपट तयार केले आहे. हे चित्रपट बघण्याकरिता यु ट्यूब चॅनल *कृपाल लांजे मोटिवेशनल* ह्या चॅनल वरती बघू शकता. यातील एक नवा चित्रपट म्हणजे *’रंगोटी’* या चित्रपटात *श्री कृपाल लांजे, निलेश जंपलवार, अनिरुद्ध सादमवार, आशुतोष सादमवार, अमोल गेडाम, रोशन जंपलवार, सचिन गेडाम, विशाल दारव्हनकर, पुष्पा निकोडे, शौर्य येनगंटे* इत्यादी कलाकारचा समावेश आहे.
या नंतर आमची टीम मोठ्या प्रोजेक्ट तयार करत असून याची शूटिंग लवकरच सुरु होईल असे डायरेक्टर कृपाल लांजे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here