गोंडपिपरी येथे काँग्रेस ओबीसी विभाग कार्यकारिणीचा विस्तार.

495

गोंडपिपरी :– गोंडपिंपरी येथे काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेस ओबीसी विभाग कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. गोंडपिपरी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे शहराध्यक्षपदी मारुती भैय्याजी नगारे तर काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वनिता सुरेश वाघाडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यादरम्यान गोंडपिपरी येथे होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात विचारविनियम करण्यात आला. येथे नगरपंचायतमध्ये काँग्रेस पक्षाची सत्तास्थापन व्हावी याकरिता ओबीसी च्या सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने नगरपंचायत निवडणुकीचं काम करेल आणि आपल्या बांधवांना, परिसराला न्याय मिळवून देण्यासाठी झटनार अशा विश्वास काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार, पोडसा चे सरपंच देविदास सातपुते, सं. गां. नि. यो अध्यक्ष विनोद नागापुरे, कृ.उ.बा.स उपसभापती अशोक रेचनकर, प स माजी उपसभापती लूकेश वानोडे, गोंडपिपरी काँग्रेसचे ओबीसी तालुकाध्यक्ष रमेश हुलके, अजय माडूरवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंडावार, वेदान मेहरकुरे, रामचंद्र कुरवटकर, बालाजी चणकापूरे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.