ओमिक्रॉन व्हेरियंट’चा नवी मुंबईला धोका

0
133

नवी मुंबई : कोविड १९ (corona) या विषाणूत झालेल्या आमूलाग्र बदलानंतर ‘ओमिक्रोन व्हेरियंट’ (Omicron variant) नवी मुंबई शहरासाठी (Navi Mumbai city) डोकेदुखी ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेसह (South Africa) बोटस्वान, हॉंगकॉंग आणि युरोप या देशांत (Europe countries) ओमिक्रोन या नव्या व्हेरीयंटची लागण झालेले रुग्ण सापडले (New patients) आहेत.

पुन्हा निर्बंधांची धास्ती; नव्या व्हेरिएंटमुळे नियम आणखी कठोर

नवी मुंबईत ऐरोली, वाशी आणि बेलापूर येथे असणारे कॉल सेंटर आणि एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये या देशातून व्यवहार चालतात. त्या धर्तीवर धोका ओळखून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गेल्‍या तीन आठवड्यात परदेशातून नवी मुंबईत आलेल्या नागरिकांची माहिती मागवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रोन या व्हेरीएन्ट बद्दल संपूर्ण जगभरातील देशांना सावधानतेचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने कोविड निर्बंधांमध्ये बदल केले आहेत.

तसेच राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याला प्रतिसाद देत अभिजीत बांगर यांनी तातडीने सर्व विभाग प्रमुख, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत शहरातील कोविड रुग्ण आणि परिस्थितीचा आढावा घेत काही नवीन सूचना दिल्या. ओमिक्रोन व्हेरिएन्टचे रुग्ण ज्या देशांमध्ये सापडले आहेत. अशा देशांना हायरिस्क देश म्हणून घोषित केले आहेत. अशा देशातून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना बांगर यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

युरोप, साउथ आफ्रिका, हॉंगकॉंग, बोटस्वाना अशा देशातील येणाऱ्या नागरिकांची माहिती घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह आलेल्या नागरिकांना घरी १४ दिवस विलगीकरण व्हावे लागणार आहे. अशा लोकांवर नजर ठेवण्याचे काम नागरी आरोग्य केंद्रांना करावे लागणार आहे. तसेच या लोकांची आठ दिवसांनी टेस्ट केली जाणार आहे. परंतु एक दिवसाआड टेस्ट करण्याचा विचारही राज्य सरकारतर्फे सुरु आहे. नवी मुंबईतील कॉल सेंटर, आयटी कंपन्यांमुळे हायरिस्क देशातून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याने महापालिकेला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here