Home Breaking News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या चंद्रपुर शहर प्रभारी म्हणून किशोर गजभिये यांची नियुक्ती…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या चंद्रपुर शहर प्रभारी म्हणून किशोर गजभिये यांची नियुक्ती…

622

चंद्रपुर: अखिल भारतीय काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांची चंद्रपुर शहर प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

येत्या काही महिन्यामध्ये चंद्रपुर शहरात महानगरपालिका निवडणूक होत असून गजभिये यांची निवड महत्वाची भूमिका पार पाडू शकते. कारण गजभिये या आधी चंद्रपुर ग्रामीण प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली असून आता चंद्रपुर शहराचा प्रभार देऊन काही दिवसांत महानगरपालिका निवडणूक असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे.

गजभिये यांच्यापुढे शहरात काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करून महानगरपालिका मध्ये जिंकून येणे हे आवाहन असेल. गजभिये यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Don`t copy text!