पेठवार्ड येथील शासनमान्य देशी दारू दुकान स्थलांतरित करु नये…  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना पेठवार्ड येथील नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी…

0
180

ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवली गेल्या नंतर अनेक वर्षे पासून बंद असलेल्या देशी दारू दुकाने सुरू करण्यात आले.पण ब्रम्हपुरी शहरातील पेठवार्ड येथे शासनमान्य देशी दारू शासनाने दिलेल्या नियमानुसार सुरू करण्यात आले. पण काही पुढारी अवैध दारू चा व्यवसाय करत असून या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अग्रेसर आहेत.

अवैध दारू विक्री मध्ये शाळकरी मुले सुध्दा कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमविण्याच्या नादात व्यवसायात गुंतलेले होते. पण शासनाने दारू बंदी उठवल्या नंतर यावर मोठ्या प्रमाणावर आळा बसलेला आहे. पेठवार्ड येथील शासनमान्य देशी दारू सुरू झाल्याने काही स्वार्थ हित जोपासना साठी नाहक देशी दारू बंद पाडण्यासाठी खोटे व बनावटी प्रशासनाला निवेदन आपले स्वार्थ हित सिध्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही पेठवार्ड येथील रहिवासी आहेत.

आम्हाला शासनमान्य देशी दारू दुकान पासून कोणत्याही प्रकारचा त्रास व अडथळा नसुन येथील नियमित शासनमान्य देशी दारू दुकान स्थलांतरित करू नये अशी मागणी पेठवार्ड येथील शेकडो नागरिकांनी स्वाक्षरीसह आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे केली.

-प्रतिभा मैंद
( 7972250918)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here