गोंडपीपरी तालुक्यातील मौजा धामणगांव येथिल 37 वर्षीय इसमाचा विजेचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना आज दि.17 ऑक्टोंबर रोज रविवारला धामणगांव येथे घडली आहे. मृतकाचे नाव राजू बोरकुटे वय 37 वर्ष रा.धामणगांव असे असून . दि.17 ऑक्टोबर रोज रवीवारला आपल्याच घरी असलेल्या पीठ दळण्याच्या चक्कीत असलेल्या वीज मिटर ची दुरुस्ती तथा पाहणी करीत असताना अचानक त्याला विजेचा जबर झडका बसल्याने तो कोसळला. विजेचा जबर झडका बसल्याने व कोसळल्याने त्याला एका खाजगी ऑटोत टाकून ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले. मृतदेहाची उत्तरणीय तपासणीकरून कुटुंबातील सदस्या कडे त्याचा मृतदेह सोपविण्यात आला. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मृतकाच्या घरी बघ्याची गर्दी दिसुन आली.
मृतकाच्या पश्चात आई, पत्नी , मुलगी, मुलगा असा आप्त परिवार असून.त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.






