गोंडवाना विद्यापीठाच्या दिक्षांत समारोहात राज्यपालांच्या हस्ते गोविंदा ढोरके यांना दोन गोल्ड मेडल प्रदान…

0
224

चंद्रपूर (सुनील डी डोंगरे )
चंद्रपूर येथील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालचे विद्यार्थी गोविंदा किशोर ढोरके यांनी विधी पदवीत् मेरिट व हिंदू कायद्यात सर्वाधिक् मार्क् प्राप्त् केल्याने दोन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
१२ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या गोंडवांना विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते गोविंदा ढोरके यांना सुवर्ण पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
दुर्गापूर येथील रहिवाशी असलेले गोविंदा ढोरके सध्या चंद्रपूर न्यायालयात ऍड श्रीधर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर म्हणून काम करत आहेत.
विधी शाखेत सुवर्ण पदक मिळवल्याने गोविंदा ढोरके यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
एका विशेष समारंभात चंद्रपूर काँग्रेस जिल्हा (ग्रामीण)चे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी ऍड गोविंदा ढोरके यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here