घरगुती भांडणातून पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीवर वार… पत्नी गंभीर जखमी.आरोपी ताब्यात.

0
290

गडचिरोली : अहेरी तालुक्यात येत असलेल्या आल्लापल्ली शहरातील भामरागड मार्गावर येत असलेल्या मनेवार वार्डात काल रात्री दिनांक १५ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी 7:30 वाजताच्या सुमारास किरकोळ वाद निर्माण झाले.त्यानंतर घरगुती वातावरणाचे रूपांतर मोठया घटनेत झाले आहे. या झालेल्या वादातून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने चक्क डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

जखमी पत्नीचे नाव ओमदेवी सतीश डोके(२५) नाव असून प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी नागपूर येते हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच आरोपी पती सतीश डोके याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कलम ३०७ अनव्य गुन्हा दाखल केला आहे. अद्याप अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अहेरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी दिली आहे.

काल दि,१५ऑक्टोबरच्या रात्री च्या सुमारास आपल्या सासरी पत्नीसह राहणाऱ्या सतीश डोके त्याची पत्नी ओमदेवी सोबत घरघुती कारणावरून भांडण झाले यात रागाचा भरात आरोपीने पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने ३ ते ४ वार केले त्यामुळे प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाला. काल दसऱ्याच्या निमित्याने आजूबाजूचे लोक दसऱ्याचा शुभेच्छा देण्यात व्यस्त असताना घडलेल्या या घटनेने आल्लापल्ली शहर हादरले आहे .

घटनेची माहिती टायगर चॅरिटेबल ट्रस्ट ला होताच क्षणाचाही विलंब न करता ट्रस्ट चे साई तुलसिगिरी यांनी लागलीच रुग्णवाहिकेद्वारे जखमी ओमदेवीला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ओमदेवीला आधी चंद्रपूर नंतर नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेचा अधिक तपास अहेरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here