पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा..

0
97

 

चंद्रपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. 13 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1.15 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. दुपारी 1:30 वाजता एन.डी हॉटेल, चंद्रपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती सोबत चर्चा. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून मुलकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता दुर्गामाता मंदिर संस्थान, मूल येथे आगमन व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन तसेच कोरोना योद्धा गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 7.15 वाजता मुल येथून रत्नापूर ता. सिंदेवाहीकडे प्रयाण. सायंकाळी 7.45 वाजता रत्नापूर ता. सिंदेवाही येथे आगमन व श्री. गुरुदेव दुर्गा उत्सव मंडळ रत्नापूर द्वारा आयोजित कार्यक्रमास उपस्थित. रात्री 8.15 वाजता सिंदेवाही तालुका पदाधिकारी यांच्या बैठकीस उपस्थित. रात्री 9 वाजता रत्नापूर ता. सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.

शनिवार दि. 16 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता सिंचाई विश्रामगृह, सावली येथे आगमन. सकाळी 11:30 वाजता सिंचाई विश्रामगृह, सावली येथे सावली तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थित. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2 वाजता सावली येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन. दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे ब्रह्मपुरी तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थित. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here