आरमोरी शहरात घरगुती वीज वाहिनी वरचे खांब लावण्याबाबत‌‌ निवेदन देण्यात आले…

0
47

गौरव लुटे,आरमोरी तालुका प्रतिनिधी

आरमोरी – शहर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. शहरातील मुख्य मार्गावरील घरगुती वीज वाहिनी वरचे खांब काही ठिकाणी वाकलेले आहेत तर काही जिर्णावस्थेत आहेत.वीज वितरित होत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे वाकलेले व जिर्णावस्थेत असलेले खांब पडल्यास जिवितहानी होण्याची परिपुर्ण शक्यता नाकारता येत नाही. विद्युत पुरवठा वारंवार खंडित करत असल्यामुळे रात्री आरमोरीवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो.हा विद्युत पुरवठा सुरळीतपणे चालू करावा,वाकलेले,जिर्णावस्थेत असलेले खांब, शहराच्या रस्त्यावरील घरगुती वीज वाहिनी लावण्याबाबत‌‌ उपकार्यकारी‌ अभियंता महावितरण कार्यालय आरमोरी यांच्या कडे सारंग जांभूळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी उमेश इंदुरकर,प्रदीप सोनटक्के,हर्ष तिरंगम , पियूष रामटेके,साबीर शेख,प्रितम धोंडाने आदी उपस्थित होते.

सारंग जांभुळे यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या समवेत निवेदन देण्यात आले . निवेदन देताना उमेश इंदूरकर , प्रदीप सोनटक्के , हर्ष तिरंगम , पियुष रामटेके , साबीर शेख , प्रीतम धोंडाने आदी उपस्तिथ होते .

निवेदनात म्हटलं आहे कि शहर विभागातील व मुख्य
रस्त्यावरील घरगुती वीज वाहिनी वरचे खांब काही ठिकाणी वाकलेले आहे . वीज वितरित होत असताना नेसर्गिक पणे वाकलेले खांब पडल्यास , जीवित हानी होण्याची परिपूर्ण शक्यता नाकारता येत नाही . अनेक दिवस पासून या खांबांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here