नक्षलवादी एक्शन टीम सदस्य अजय हिचामी यास गडचिरोली पोलिसांकडून अटक…

0
351

 

एटापल्ली :- हेडरी पोलीस उपविभागा अंतर्गत जांबिया गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत सोमवारी गडचिरोली पोलीसांचे विशेष पथक सी-६० हे नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना गोपनिय माहितीच्या आधारावर नक्षलवादी अजय हिचामी यास अटक करण्यात आले असल्याचे पोलीस वार्तापत्रात म्हटले आहे. सदर नक्षवाद्याला कुठे आणि कशी अटक केली हे पोलीसांनी स्पष्ट केले नाही.

पोलीस वार्तापत्रानुसार अजय हिचामी (३०) राहणार झारेवाडा ता. एटापल्ली हा २०१९ मध्ये गट्टा दलममध्ये भरती होऊन सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तो नक्षल्यांच्या एक्शन टीमचा सदस्यही होता. यावर्षी गट्टा व बुर्गी पोलीस मदत केंद्रावर नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा समावेश होता. १८ सप्टेंबर रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी सडमेक याच्या खुनामध्ये सक्रीय सहभाग असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. त्यांच्यावर शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. त्याचेवर तीन खुन, पाच चकमकी व एक दरोडा असे ९ गुन्हे दाखल आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षल विरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here