ओबीसी समाजाकडून तहसीलदारांना निवेदन…

79

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली

एटापल्ली: आज एटापल्ली
तालुका ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने मा. तहसीलदार हेमंत गांगुर्डे साहेब, तहसील कार्यालय एटापल्ली येथे २ सप्टेंबर २०२५ चा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हैद्राबाद गेझेट नुसार या समाजाला आरक्षण जाहीर केले आहे.यामुळे अखील ओबीसी आरक्षणावर भविष्यात दुरगामी परीणाम होनार आहे. हा निर्णय रद्द करुन ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही य बाबत निवेदनात आवश्यक मुद्दाची मागणी केली आहे.
या प्रसंगी ओबीसी शिष्टमंडळ व तसेच ओबीसी कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव चनकापुरे, श्री राकेश मुकेवार, ओबीसी बांधव प्रा. घोंगडे सर श्री कीशोर मालेवार, प्रा. कोंगरे सर , प्रा. डांगे सर , भोयर सर, प्रा. वडस्कर सर व प्रा. बारसागळे सर इत्यादी मान्यवर निवेदन देतानां उपस्थित होते.