वेन्हारा रोपी बारसा इलाकाच्या वतीने ३३/११ केव्ही उपकेंद्राची मागणी…

140

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

कसनसुर:
एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथे स्वतंत्र ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारा अशी मागणी धरून इलकातील हजारो नागरिक उतरले रस्त्यावर
कसनसुर परिसरात कसंसुरच्या हद्दीत सुमारे पंधरा गावचा समावेश आहे,या परिसरात नेहमीच विजेचा लपंडाव सुरू असतो व कमी दाबाचा वीज पुरवठा असतो या समस्येला कंटाळून परिसरातील हजारो नागरिक आज कसनसुर येथील मुख्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे
कसनसुर येथे स्वतंत्र उपकेंद्र झाल्यास येथील अनेक गावा करीता सोईचे होणार असल्याने
कसनसुर येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करावी अशी मागणी यावेळी इलाकाच्या नागरिकांनी केली आहे