धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपुर येथील हजरजबाबी नेतृत्व हरपलं* माजीआमदार सुदर्शन निमकर

0
155

चंद्रपूर:चंद्रपुरचे माज़ी नगराध्यक्ष , प्रतिष्ठित व्यवसायिक, ज्येष्ठ नेते गयाचरणजी त्रिवेदी उर्फ धुन्नु महाराज यांच्या निधनाने चंद्रपुरच्या विकासातील महामेरु गमावल्याची भावना सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. धुन्नू महाराजांशी आमचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते. महाराज गेल्या अनेक वर्षांपासून आमच्याकडे दरवर्षी न चुकता हुरडा खाण्या करीता येत होते. या निमित्ताने आमच्या कुटुंबाशी जवळीक होती.एक धडाडीचा नेता आम्ही गमावल्याची शोकभावना माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपुरचे नगराध्यक्ष म्हणून धुन्नू महाराज यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. धुन्नू महाराज यांनी आपल्या विचाराशी तडजोड केली नाही. यांच्या निधनाने चंद्रपुरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, असे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here