नागपूर: आँरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर येथे दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी *शिक्षणतज्ञ डॉ. चंदनसिंहजी रोटेले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा* अॉनलाईन पद्धतीने सपंन्न झाली. स्पर्धेचा विषय *”लोकशाहीच्या संवर्धनात प्रसार माध्यमांची भूमिका”* हा होता. वक्तृत्व स्पर्धेचे उद्धघाटन संस्थाध्यक्ष डॉ. चंदनसिंहजी रोटेले यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था उपाध्यक्ष श्री. केदारसिंहजी रोटेले यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. या स्पर्धेत राज्यातील वेगवेगळ्या आठ विद्यापिठातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – कु. अनिशा हांगे (फर्ग्युसन कॉलेज, पुणे), द्वितीय क्रमांक – सिद्धार्थ चव्हाण (शिवाजी कॉलेज राजुरा, जि. चंद्रपुर) तर तृतीय क्रमांक – नितिन मुंडे (वैद्यनाथ काँलेज, परळी वै. जि. बीड) हे विद्यार्थी विजेते ठरले. स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ. व्यंकटी नागरगोजे व कु. कल्पना मुकुंदे यांनी केले. या अॉनलाईन कार्यक्रमास बहुसंख्य श्रोते राज्यभरातुन उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन कु. कल्पना मुकुंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. व्यंकटी नागरगोजे यांनी केले.
*********
वक्तृत्व स्पर्धेतून झाला लोकशाही मूल्यांचा जागर ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न..
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
RELATED ARTICLES