आलापल्लीत ट्रामा केअर युनिट सुरू करणार आमदारांचे नागरिकांना आश्वासन…

255

आल्लापल्ली: आलापल्लीत ट्रामा केअर युनिट सुरू करणार आमदारांचे नागरिकांना आश्वासन आलापल्ली अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यासाठी आलापल्ली हे केंद्र बिंदू आहे. येथे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी तत्काळ आरोग्य सेवा नाही. येथून थेट चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रुग्णांना उपचारासाठी न्यावे लागते. अनेकदा वाटेतच रुग्णांना प्राण गमवावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी आलापल्ली येथे ट्रामा केअर युनिट सुरू करणे गरजेचे आहे. त्याकरिता आपण ३० ते ५० खाटांचे ट्रामा केअर युनिट सुरू करणार अशी ग्वाही आमदार डॉ

देवराव होळी यांनी आलापल्ली येथील भेटीदरम्यान दिली.
आलापल्ली येथे आमदार होळी यांनी भेट देऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यापाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान चंद्रकिशोर पांडे यांच्या प्रतिष्ठानास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी अमोल कोलपाकवार, गंगाधर रंगुवार, मिलिंद खोंड, जहांगीर शेख उपस्थित होते. व्यापारी व पत्रकार संघटनेच्या वतीने आमदार डॉ. होळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी हजर होते..