Advertisements
दिपक साबने,जिवती(प्रतिनिधी)
Advertisements
जिवती: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षा २०२१ मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उपरी येथील विद्यार्थिनी कुमारी रिद्धी नंदकिशोर संतोषवार हिची जवाहर नवोदय विद्यालय तळोधी बा. येथील इयत्ता ६ वी साठी निवड झालेली आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उपरी या शाळेने मागिल वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे. मागिल सत्रात दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती. कुमारी रिद्धी नंदकिशोर संतोषवार हिने यशाची पायरी गाठलेली आहे.
यशाचे श्रेय रिद्धीने संतोषवार हिने मार्गदर्शक शिक्षक मिलींद खोब्रागडे व सर्व शिक्षकवृंद तसेच आई वडिलांना दिले आहे.
रिद्धीच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच व गावकरी यांनी भरभरून कौतुक करत समाधान व्यक्त केले.
Advertisements
Advertisements